🕒 1 min read
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे आणि भाजप सरकार आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेले सामना मधून आज भाजपवर टीका करण्यात आली आहे. अशातच त्याच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पलटवार करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
अतुल भातखळकर यांचे वक्तव्य-
अडीच वर्ष वाफा आणि थापांशिवाय काही केलं नाही, आता दुसऱ्यांच्या नावाने उर बडवतायेत, असं म्हणत अतुल भातखळकरांनी शिवसेनेवर सडकून वार केला आहे. यासंदर्भात अतुल भातळकर यांनी आपल्या ट्वटर आकाऊंटवरून ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेंनी घरी बसून पक्ष गमावला, असल्याचंही त्यांनी त्यामध्ये लिहिलं आहे.
घरी बसून पक्ष गमावला, अडीच वर्ष वाफा आणि थापांशिवय काही केले नाही… आता दुसऱ्यांच्या नावाने उर बडवतायत. pic.twitter.com/E64xaazwWD
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 5, 2022
तसेच, तुम्ही सातत्याने भाजपला कमळाबाई म्हणत हिणवता, आम्हीही तुम्हाला ‘पेंग्विन’सेना म्हणू असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला होतो. त्यानंतर आज पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा ‘कमळाबाई’ असा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
दरम्यान, शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. मराठी माणूस आपसात लढवला जात आहे. कमळाबाईचे हेच तर मिशन होते. ज्यांचे पक्ष कमिशनखोरीच्या मलिद्यावर तरारले आहेत त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? पण हे राज्य शिवरायांचे आहे. येथे बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानी मर्द मावळे घडवले, ते मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा! बाकी सारे शिवतीर्थावरच, असं सामनामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । मेल्या आईचे दूध प्यायलेले नाहीत याचे भान राखा; शिवसेनेचा भाजपाला इशारा
- Mumbai : गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल, आज ठरणार का BMC निवडणूकीची रणनीती..!
- Ambadas Danve | शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; दानवेंचं गायकवाडांना प्रत्युत्तर
- IND vs PAK । “बाबर आझमने या क्रमांकावर फलंदाजी केली, तर भारताविरुद्ध… “; सामन्यापूर्वीच माजी खेळाडूच मोठे विधान
- Cyrus Mistry Death । टाटा ग्रुपचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा पालघरमधील रस्ते अपघातात मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
