Share

पुणे तिथे काय उणे ? कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला भाजपच्या खासदार-आमदारांसह दिग्गज नेत्यांची हजेरी

Published On: 

🕒 1 min read

पुणे : देशाच्या स्वांतत्र्यलढाईत १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर एका नेतृत्वाची गरज होती त्यातून १८८५ साली राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली. लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देशात एक लढा उभा केला. काँग्रेसच्या स्थापनेमुळे भारत एक राष्ट्र म्हणून जगाला ओळख झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभर आंदोलने करून ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला.

मीठाचा सत्याग्रह, अहसहकार चळवळीच्या माध्यमातून देशात सर्वांना बरोबर घेऊन एक लढा उभा राहिला. १९४२ ला चले जाव ची हाक दिली गेली आणि नंतर १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश एकजुटीने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकवटला. भारताला एक वैभवशाली राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेसची महत्वाची भूमिका राहिली आहे.

दरम्यान,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिन काल राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये साजरा करण्यात आला.मात्र सध्या विशेष चर्चा सुरु आहे ती पुण्यात झालेल्या एका घटनेची. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 135 वा वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र पुणे शहर काँग्रेस कार्यालयामध्ये मात्र काल अनोखं दृष्य पहायला मिळालं.कॉंग्रेसच्या वर्धापन दिनाला चक्क भाजपाच्या नेत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी कॉंग्रेस कार्यालयाला भेट दिली.

प्रेम नसलं तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असं म्हणत खासदार गिरीश बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. यावेळी बापट यांच्यासह भाजप नगरसेवक, कार्यकर्ते यांचा मोठा ताफाच काँग्रेस भवनामध्ये दाखल झाला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांचं स्वागत केलं. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्वांनी मनसोक्त दिलखुलासपणे गप्पा मारल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!