अमरावती : संजय राऊत यांनी उगाच डराव डराव करू नये. दमबाजी तर बिलकुल करू नये. एका नोटिसनेच ते हादरले आहेत. त्यापेक्षा मुकाट्याने दाम – दमडीचा हिशोब ईडी कार्यालयात जाऊन द्यावा, असे आव्हान भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी दिले आहे.
ईडीने नोटीस पाठवल्या नंतर शिवसेना खा. संजय राऊत यांनी भाजपाला दिलेल्या इशाऱ्यांवर आ. आशिष शेलार अमरावती येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री प्राचार्य अशोक उईके, आ. आकाश फुंडकर, आ. प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय राऊत बोलतात ते तथ्यहीन आहे. एका नोटिसनेच ते हादरले आहेत. ईडीने नोटीस दिली आहे तर प्रथम त्यांनी दाम – दमडीचा हिशोब देऊन स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करावे. कर नाही तर डर कशाचा ? डराव डराव करण्यापेक्षा हिशोब द्यावा. सीबीआय असेल, ईडी असेल अशा एजन्सीज वर दबावतंत्र टाकण्याचे काम शिवसेना सातत्याने करते आहे. यामुळे या एजन्सीजचे पावित्र्य नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. नाहक भाजपा नेत्यांकडे इशारा करून दमबाजी करू नये.
संजय राऊत हे महाराष्ट्राचेच आहेत. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत या परिवाराचाच एक भाग मानतो. म्हणून आमच्याही मनात त्यांच्याविषयी सहृदयता आहे. पण अशा दमबाजीने काय साध्य होणार, असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. कोणाच्या बायका – मुलांना नोटीस मिळाली तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग कंगना राणावत चे घर बुलडोझर लावून पाडणे मर्दपणा होता का ? कंगना राणावतला मुंबईत पाय ठेऊ देणार नाही म्हणून केलेला आकांत तांडव हा मर्दपणा होता का ? असे प्रतिप्रश्न देखील आ. आशिष शेलार यांनी उपस्थित केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडी पुढे आपले म्हणणे सादर करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला’
- इच्छा असूनही युवराजला सय्यद मुश्ताक अली टी २० मध्ये संधी नाही
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षाचा शेवट गोड! केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
- भारताला एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून ओळख देण्यात काँग्रेसचे मोलाचे योगदान – बाळासाहेब थोरात
- नववर्ष स्वागताला ‘बसायचा प्लॅन’ करत असाल तर सावधान, ‘अशी’ असेल नियमावली


