🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. नुकत्याच ६ वी ते ८ वीच्या शाळा सुरु झाल्या आहेत. सुरुवातीला कमी मिळणारा प्रतिसाद वाढत जातांना दिसतो. सर्व खबरदारी पाळत, नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेचा परिसर बागडू लागला आहे. सध्या सरासरी ५० ते ७५ टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थित असल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले. येत्या सोमवारपासून नवीन आठवड्यात विद्यार्थी संख्या वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शाळेचा गणवेश, पाठीवर दप्तर आणि चेहऱ्यावर मास्क लावत दररोज मनपा प्रियदर्शनी विद्यालयाचे विद्यार्थी शाळेत हजर राहू लागले. कोरोना या आजारामुळे मार्च २०२० पासून शाळा बंद असल्याने घरात कंटाळलेल्या विद्यार्थी उत्साहात आहेत. ‘शाळा सुरू होण्याची, आम्ही वाटच बघत होतो. आता आम्ही दररोज शाळेत येणार, सर्व नियमाचे पालन करणार आणि खूप अभ्यास करणार ‘.अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाणे, गोष्टी व थोडा अभ्यास देऊन त्यांच्यामध्ये उत्साह वाढविला. सर्व विद्यार्थ्यांना दररोज सॅनिटायझरचा वापर करून, थर्मल गनद्वारे तापमान व ऑक्सीमीटरद्वारे मुलांची ऑक्सीजन लेवल तपासली जात आहे. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका सुरेखा महाजन, शोभा पवार, सूर्यमाला जाधवर, प्रकाश इंगळे, रश्मी होनमुटे आदी शिक्षक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार निवड समितीवर आपेगावकर
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- तीन दशकांपासूनच्या अतिक्रमणावर मनपाची कारवाई
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- कर्नाटकमधील भाजप नेत्यांची वक्तव्य चुकीची, आम्ही त्यांचा निषेध करतो- चंद्रकांत पाटील


