Share

Nana Patole : शिंदे गटतील एका आमदाराला 50 कोरोड देण्याचा प्रयत्न सुरू; नाना पटोलेंचा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सुरु घडामोडींवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत अनेक आरोप देखील केले आहेत. यावेळी पटोले यांनी थेट दिल्लीलाच इशारा दिला आहे. दिल्लीला हे महाग पडणार आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने राज्यावर नजर टाकली तेव्हा नाश झाला आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम दिल्लीला भोगावे लागतील. त्यामुळे तमाशा थांबवा. भाजप केंद्रातील सरकारच्या भरवश्यावर राष्ट्रपती राजवट लागू करू पाहत आहे. जर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही पटोले यांनी दिला.

पुढे पटोले म्हणाले कि, एकनाथ शिंदे गटतील एका आमदाराला 50 कोरोड देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. जे आमदार बोलत आहेत ते काही पैशावर आणि काही ईडीच्या भरवशावर बोलत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना पार्टी संपवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. शिवसेनेच्या भरवशावर जे मोठे झाले ते आज शिवसेना संपवू पाहत आहेत. भाजपच्या हिंदू प्रेमात कोणतीही प्रामाणिकता नाही. पाकिस्तानचे समर्थन करत तत्कालिन मुख्यमंंत्री मेहुबुबा मुफ्तीसोबत यांनी साडेतीन वर्षे सरकार चालवलं आहे. असं म्हणत पटोलेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. केंद्राने बंडखोर आमदारांना पुरवलेल्या सुरक्षेवर पटोले म्हणाले, आसाममध्ये पूरपरिस्थिती असून तेथील लोकांमध्ये आक्रोश आहे. गो बॅक महाराष्ट्र असे तिथले लोक या आमदारांना म्हणत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षा देण्याचा अधिकार मात्र केंद्रांने आमदारांच्या घरची सुरक्षा वाढवली आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!