🕒 1 min read
नागपूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. अशातच आज कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका करताना, दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा, अंस म्हटलं होत. त्यांच्या या टीकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत २०१९ मध्ये कोणाच्या नावाने मत मागितले, हे सर्वाना माहीत आहे. “जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे. संजय राऊत रोज खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली नेण्याचे काम करत असल्याचा आरोपही सुधीर मुंनगंटीवार यांनी केला. तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भारतीय जनता पार्टी वर आरोप करत आहेत. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची आहे.” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.
तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपला देण्याची गरज नाही. बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे अशी माहिती समोर येत आहे. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी कंगना राणावत प्रकरणाची आठवण करून देत “या बंडखोर आमदारांच्या जीवाला धोका असेल तर आणि तशा पद्धतीची माहिती सरकारला मिळाली असेल तर ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे” असं म्हटलंय.
अनेक मोठे नेते आहेत जे धमक्या देत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचं नाव घेतलं नाही तरी रोख हा त्यांच्याकडेच असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यातून दिसून आलं. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात चालू असलेल्या अनेक विषयांवर भाष्य करत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
