Share

Jug Jug Jeeyo : विकेंडला ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाने केली धमाकेदार कमाई ; प्रेक्षकांकडून कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘जुग जुग जिओ’ (Jug Jug Jeeyo) हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी हे महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर धुमाकुळ घातला होता. चित्रपटाने शुक्रवारी ९.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर संध्याकाळच्या शो ची जास्त कमाई होती. नंतर शनिवारी १२ कोटींची कमाई झाली. शुक्रवारच्या कमाईच्या तुलनेत शनिवारी ४० टक्क्यांची वाढ पहायला मिळाली. रविवारी देखील असाच प्रतिसाद मिळाला तर कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

या वर्षांमध्ये पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. पहिल्या क्रमांकावर ,भूल भुलैया २’ हा चित्रपट आहे तर पाचव्या क्रमांकावर ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट आहे.

दिग्दर्शक राज मेहता यांच्या वैवाहिक जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा एक मनोरंजन चित्रपट आहे. अनिल कपूर, नीतू कपूर, वरून धवन, आणि कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मनीष पॉल आणि प्राजक्ता कोहली हे देखील आहेत. माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगवेळी काही लोकांना कोरोना झाला होता. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!