🕒 1 min read
पाटणा : बिहारमधील पाटणामध्ये निवडणुकीचा प्रचार थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात एक ठार तर २३ पोलीस जखमी झाले आहेत.
शुक्रवारी रात्री पाटणाच्या धनरुआमध्ये ग्रामस्थ आणि पोलिसांत ही चकमक झाली. यावेळी ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास २३ पोलीस जखमी झाले आहेत. यात परिमंडळ निरक्षकासह धनरुआ पोलीस ठाण्यातील पोलिसांचा समावेश आहे. यातील काही पोलिसांची प्रकृती चिंताजणक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी सुमारे ३० ते ४० राऊंड फायर केले आहेत. तसा अहवाल पोलिसांनी दिला आहे.
या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सदरील निवडणूक केंद्र हे संवेदनशिल असल्याने तीथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे, त्या हत्याच!’
- ‘आयुक्त पांडेय यांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर चालवण्याच्या निर्णयास तत्काळ स्थगिती द्या’, मुख्यमंत्र्यांकडे मागणी


