Share

परभणी जिल्ह्यात ऊसतोड मजूर महिलेवर अत्याचार

Published On: 

परभणी : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. अशा घटना जिल्ह्यातही वाढत आहेत. घटना गंगाखेड येथे घडली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे ऊसतोडणीचे काम करणाऱ्या एका २० वर्षीय मजूर महिलेवर एका आरोपीने अतिप्रसंग केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवारी त्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव दुधाटे येथे शेतामध्ये काम करणारी ऊसतोडणीस असलेली २० वर्षीय मजूर महिला याच गावातील रहिवासी आहे. बळीराजा साखर कारखान्यामध्ये तिचा नवरा व फिर्यादी महिला ऊसतोडणीचे काम करतात. रविवारी दिवसभर देऊळगाव दुधाटे गाव शिवारामध्ये ऊसतोडणीचे काम करून गाडी भरून दिल्यानंतर महिला घरी आली. सायंकाळी सात वाजता तिच्या घरात भाकरीसाठी पीठ नव्हते. नवऱ्याला सांगितले की, तुम्ही दळण करून घेऊन या. त्यामुळे नवरा साडेसात वाजता दळण करून आणण्यासाठी गावात गेला. रात्री उशिरापर्यंत आलाच नाही. त्यामुळे सदर पीडित महिलेने घरातील तांदूळ भात करून खाऊन घरांमध्ये झोपली.

तेव्हा आरोपी प्रल्हाद दुधाटे हा त्या महिलेच्या घरात घुसून सदर महिलेचे तोंड दाबून तिच्यासोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला. सदर घटना तिने शेजारी राहत असलेल्यांना सांगितली. नवरा घरी आल्यानंतर पतीला घेऊन तिने सासू-सासरेच्या कानावर हा विषय घातला. त्यानंतर मंगळवारी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून गंगाखेड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!