Share

 पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर इंग्लंडच्या २७ षटकांत २ बाद ६७ धावा

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर इंग्लंड संघाने पहिल्या डावात २७ षटकांत २ बाद ६७ धावा केल्या आहेत.

इंग्लंडच्या रॉरी बर्न्स आणि डॉमनिक सिब्ली या सलामीवीरांच्या जोडीने काही शानदार फटके मारत आणि एकेरी-दुहेरी धावांवर भर देताना पहिल्या २० षटकांत भारतीय गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. त्यांनी २० षटकात इंग्लंडला ५० धावांचा टप्पाही पार करुन दिला होता.

अखेर आर अश्विनने २४ व्या षटकात रॉरी बर्न्सला बाद केले. बर्न्स ६० चेंडूत ३३ धावा करुन यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर २६ व्या षटकात लगेचच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डॅनिएल लॉरेन्सला जसप्रीत बुमराहने पायचीत बाद केले. लॉरेन्स शुन्यावर बाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुट फलंदाजीला आला आहे.

रुट फलंदाजीला आल्यानंतर २७ व्या षटकांत धावबाद होता होता वाचला. इंग्लंडने पहिल्या सत्राखेर पहिल्या डावात २७ षटकांत २ बाद ६७ धावा केल्या आहेत. सध्या रुट ४ धावांवर आणि सिब्ली २६ धावांवर नाबाद खेळत आहे.

भारतीय संघ –

रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम

इंग्लंडचा संघ –

रॉरी बर्न्स, डोमिनिक सिबली, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, जोस बटलर (यष्टीरक्षक), डोमिनिक बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अँडरसन

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!