Share

यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडीचे हादरे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेले दिसताय- अतुल भातखळकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगावमधील निवासस्थानी काल (२५ फेब्रु.) पहाटेच ईडीने धाड टाकली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीपूर्वीच होत असलेल्या या कारवाईमुळे चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाना साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘यशवंत जाधव यांच्यावर पडलेल्या धाडीचे हादरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यत गेलेले दिसतायत. मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला घराच्या बाहेर पडले नाहीत. परंतु एका खासगी कार्यक्रमाला ३ दिवसांनंतर ते बाहेर पडले. सगळीकडे गांज्याची शेती दिसतीये, असे ते म्हणाले. अहो मुख्यमंत्री साहेब प्रशासन तुमच्या हातात आहेत ना. चौकशी करा. तसेच चौकशीला निर्भयतेने सामोरे जा’, असे भातखळकर म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘त्याच्यामुळे तुम्ही हिंदुत्व सोडलं. दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या माणसाला वाचवण्यासाठी त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळात बसले. त्यामुळे तुमच्या ह्या फुकटच्या गप्पा आणि पातळी सोडून केलेली भाषा याच्यावरून जनता खुश होणार नाही. तुमचं पूर्ण स्वरूप आता उघडं पडलं आहे’, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!