Share

राणेंच्या पक्षाचा कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातील उमेदवार ठरला

Published On: 

🕒 1 min read

मालवण : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. खासदार नारायण राणेंच्या पक्षाने देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.

विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून नारायण राणे यांनी निवडणूक न लढविल्यास जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत हे हे स्थानिक असल्याने त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या बैठकीत स्वाभिमान पक्षाच्या संघटना बांधणीविषयी चर्चा झाली. या चर्चेत लवकरच जिल्हा परिषद मतदार संघनिहाय पक्षाच्या बैठका घेण्याचे ठरले. त्यानंतर झालेल्या चर्चेत कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमान पक्षाचा उमेदवार कोण असावा? याविषयीची चर्चा रंगली यानंतर एकमुखाने जिल्हाध्यक्ष देवदत्त सामंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या उमेदवारीबाबत माजी मुख्यमंत्री राणे हेच अंतिम निर्णय घेणार असले तरीही या मागणीचा विचार करावा, असे मत पदाधिकाऱ्यांनी मांडले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!