टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘वाढती बेरोजगारी, उद्योगांना लागलेली अधोगती आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्किल करून टाकणारा कारभार भाजप सरकारकडून सुरू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी भाजपकडून विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकाविणे, त्यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी दबाव टाकणे, असे प्रकार सुरू आहेत. सीबीआयसह इतर महत्त्वाचे विभाग हाती घेत कारवाईची भीती घालत ‘टॅक्स टेररिझम’चा वापर सुरू असल्याचा आरोप केला आहे.

तसेच पुढे बोलताना चव्हाण यांनी ‘ल्या पाच वर्षात देशविकासाचे काहीही काम न करता भाजपने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय सुरक्षा, पाकिस्तानसारख्या भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवत सत्ता मिळविली असली तरी, त्यांना सर्वसामान्यांशी देणे-घेणे नाही असं विधान करत सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीवेळी संपूर्ण देशभरात भाजपविरोधी वातावरण असतानाही लागलेला निकाल अनपेक्षित आहे. त्यामुळे निवडणुका ईव्हीएमवर नव्हे, तर मतपत्रिकेवर घेण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. या निवडणुकाही मतपत्रिकेवर घेतल्या असत्या, तर निश्चितच निकाल वेगळा लागला असता. जनतेला केवळ भूलथापा देण्याचे काम भाजपकडून सुरू आहे असंही चव्हाण पुढे बोलताना म्हणाले.
‘गिरीश बापट’ खरे बोलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन; पृथ्वीराज चव्हाण
…तर सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी दाखवणार शिवेंद्रसिंहराजेंना कात्रजचा घाट ?
कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंना अटक, महाजनादेश यात्रेत करणार होते निदर्शने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

