Share

‘केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरून महंत नरेंद्र गिरींची हत्या’, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Published On: 

नवी दिल्ली : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे.

या घडामोडीनंतर काँग्रेसने महंत यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे. ‘महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली असून, काही केंद्रीय नेत्यांच्या सांगण्यावरुनच ही हत्या झाली आहे’ असा आरोप मध्यप्रदेशचे माजी मंत्री सज्जन वर्मा यांनी आरोप केला आहे. तसेच आम आदमी पार्टी आणि शिवसेनेनेही त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. या घटनेचा तपास सीबीआय मार्फत व्हावा आणि निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र सिंह यांनी केली आहे.

दरम्यान, महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या प्रकरणाचे विविध पैलू आता सर्वांसमोर येत आहेत. आत्महत्येपूर्वी महंत नरेंद्र गिरी यांनी एक स्थानिक भाजपा नेते अनुराग संत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. त्याशिवाय अन्य एका भाजपा नेते संदीप तिवारी यांच्याशीही बोलणं झालं होतं. अनुराग संत आणि संदीप तिवारी दोघंही महंतांच्या निकटवर्तीय होते अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!