Share

‘सरकारने माझ्या मुलाला गोळ्या घालाव्यात, त्याचा मृतदेह प्राण्यांना खायला द्या’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- आसाममधील कमर- उर- जमान हा युवक हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची पोस्ट सध्या व्हायरल झाली असून या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हि धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर कमर- उर- जमान याच्या आईने घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. देशापेक्षा मोठे कोणीही नाही. माझा मुलगा दहशतवादी संघटनेत सामील झाला असेल तर सरकारने त्याला गोळ्या घातल्या पाहिजे, अशी रोकठोक भूमिका या तरुणाच्या आईने घेतली आहे.

qamer-uzzaman 1

आसाममधील जमुनामूख येथे राहणाऱ्या कमर- उर- जमान हा तरुण हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कमरच्या हातात बंदुक घेतलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये कमर हिज्बुलचा दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. आसाममधील पोलिसांनी या फोटोची दखल घेतली आहे.

कोण आहे कमर- उज- जमान?
कमर हा दहावीपर्यंत शिकलेला आहे. आसाममधील जमुनामूख येथील रहिवाशी असलेला कमर- उज- जमान विवाहित असून त्याला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे.‘१० महिन्यांपूर्वी कमर व्यवसायानिमित्त काश्मीरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला .गेल्या वर्षी कमरच्या कुटुंबीयांनी जम्मू- काश्मीर पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल केली होती. काश्मीरमध्येच तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कमरच्या आईची संतप्त प्रतिक्रिया?
‘जर तो खरंच दहशतवादी संघटनेत सामील झाला असेल तर सरकारने त्याला गोळ्या घातल्या पाहिजे. तो देशाचा शत्रू आहे. आम्हाला मुलाचा मृतदेहदेखील नको. त्याचा मृतदेह प्राण्यांना खायला घातला पाहिजे. असा व्यक्ती जिवंत राहायला नको.- तेहरा बेगम’ 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!