Share

‘राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार’- अमित देशमुख

Published On: 

लातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या वेळापत्राकांमध्ये अनेकवेळा बदल करण्यात आले होते. आता राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

यावेळी देशमुख म्हणाले, कोरोनाच्या पादुर्भावामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये वारंवार बदल केले गेले, आता पुन्हा २ जून पासून सूरु होणाऱ्या परीक्षा पूढे ढकलण्यात आल्या असून आता १० ते ३० जून दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहेत, तसेच या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस.,बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहेत. परंतु एकीकडे कोरोनाचा समाना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून परिक्षा १० दिवसात पूढे सरकल्याने या १० दिवसात लसीकरण होणार आहे का? तसेच सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवा सोबत खेळायचं ठरवल आहे का, आशा प्रतिक्रियाही आता येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!