मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तेव्हापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे खेळी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उरूस निमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडिओवरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी असं केलं असतं तर असं म्हणत फडणवीसांवर हल्ला केला आहे.
मनिषा कायंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणाः
हे जर शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असते तर यांनी हिंदुत्व सोडलं असा भाजपने अपप्रचार केला असता, असं म्हणत मनीषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस अनवर निशाणा साधला आहे.
सूफी संत बाबा तर ताजुद्दीन यांचा यांचा शंभरावा वार्षिक उरूस 21 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे मागील दोन वर्ष कोरोना सारख्या महाभयंकर विषाणू ने सगळीकडे थैमान घातला असल्यामुळे गेल्या दोन वर्षात हा उत्सव साजरा झाला नसल्यामुळे माझ्याकडे जगभरात भाविक येण्याची शक्यता आहे या उत्सवामध्ये जगभरामध्ये 15 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मनीषा कायंदे यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Maratha Kranti Morcha | “छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व आम्हाला नको” – मराठा क्रांती मोर्चा
- Asia Cup 2022 : भारत की पाकिस्तान, आशियातील सर्वात यशस्वी संघ कोणता? दोघांनी खेळले आहेत 129 फायनल
- Pruthviraj Chauhan | काँग्रेस सोडून जाणाऱ्या आमदारांवर पृथ्वीराज चव्हाण उघडपणेच बोलले
- Shivsena | शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती, मतभेद झाले तर काय?, पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितला उपाय
- Shivsena । “जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे, तशीच महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना तयार झाली”


