🕒 1 min read
नांदेड : देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधील दुफळी उघड झालीये. माजी मंत्री व जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत. ते भाजपमध्ये नाराज होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली होती. मात्र, त्यानंतरही खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकीची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
देगलूर-बिलोली मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान आहे. येथे कॉँग्रेसचे उमेदवार व अंतापूरकरांचे पुत्र जितेश अंतापूरकर आणि भाजपचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात लढत होईल. महाविकास आघाडीच्या प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे.
या मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. अशोक चव्हाणांचे मेव्हुणे भास्करराव पाटील खतगावकर येथून तीनदा कॉँग्रेसचे आमदार होते. त्यांचे चव्हाणांशी बिनसल्यानंतर २०१४ च्या भाजप लाटेत त्यांनी भाजपशी घरोबा केला. पण भाजपने त्यांना पक्षसंघटनेतच गुंतवून ठेवले. प्रदेश उपाध्यक्ष असूनही त्यांच्या सुनेला ते नायगावमधून उमेदवारी देऊ शकले नाहीत. त्यातच आता त्यांना विश्वासात न घेता भाजपने साबणेंना शिवसेनेतून आयात करत उमेदवारी दिली. त्यामुळे ते भाजपावर नाराज होते.
दरम्यान, अतिवृष्टी पाहणीनिमित्ताने नांदेड दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी खतगावकर यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी ३ ऑक्टोबरला जाऊन भेट घेतली होती. या भेटीत पोटनिवडणुकीसंबंधी फडणवीस व भास्करराव पाटील खतगावकर यांच्यात बंद खोलीत अर्धातास चर्चा झाली होती. त्यावेळी फडणवीस हे खतगावकरांची मनधरनी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज रविवारी खतगावकरांनी काँग्रेस प्रवेशाची घोषणा केल्याने फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे.
तीन दिवसांपूर्वी आखली होती रणनिती
बिलोली येथे तीन दिवसांपूर्वी गुरुवारी भास्करराव पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. भाजपमध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही. पुढे आपण काय निर्णय घ्यावा यावर विचार करण्यासाठी ही बैठक खतगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. खतगावकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, आम्ही कोणत्याची पक्षांशी बांधील नाहीत, अशी भूमिका या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माडंली. त्यानंतर आज रविवारी त्यांनी भाजप सोडण्याचे जाहीर केले. भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेड जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. पाटील हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार व राज्याचे मंत्री देखील राहिले आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांच्या बहीण स्नेहलता यांचे खतगावकर हे पती आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आत्मविश्वासाने लढा विजय आपलाच; चंद्रकांत पाटलांकडून नगरसेवकांना विश्वास
- भारत-पाकिस्तान सामन्यादिवशी सानिया मिर्झाने सोशल मीडियापासून दूर राहण्याचा घेतला निर्णय
- ‘अजितदादांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?’
- ‘बकऱ्याला कापायच की जगू द्यायचं, हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचा असतो’
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
