मुंबई : देशामध्ये नुकतेच पाच विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. तसंच यासोबत पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. या समितीत वरिष्ठ नेते सलमान खुर्शिद, माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी, व्हिन्सेंट पाला, खा. ज्योती मणी हे चार सदस्य असतील. देशात नुकत्याच पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील ही समिती या पाचही राज्यांच्या निकालाचे विवेचन करून पुढील १५ दिवसांत आपला अहवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सादर करेल.
या जबाबदारीबद्दल अशोक चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीच्या निकालाबाबत संबंधित राज्यांमधील काँग्रेसचे उमेदवार, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून आपण अहवाल सादर करू, असे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सलाम मुंबईकर ; सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या २ हजारांखाली
- जायकवाडी धरण उशाशी असूनही, पैठणवासीयांच्या घशाला कोरड!
- इतर शहरांनी मुंबई, पुण्याकडून शिकण्याची गरज ; मोदी सरकारने केले कौतुक
- कॅबिनेट बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास, आम्ही लढण्यास सज्ज- साष्टपिंपळगाव आंदोलक
- सलाम मुंबईकर ; सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या २ हजारांखाली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

