🕒 1 min read
मुंबई:- राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाने विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त केला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासंदर्भात आज 20 जानेवारी रोजी महत्वाची सुनावणी होणार होती.
दरम्यान आज होणारी सुनावणी पुढे ढकली असून आता पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आज होणारी सुनावणी पुढे ढकल्यामुळे राज्यातील मराठा समाजासह अनेक राजकीय नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, शिवसंग्राम संघटेनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री सकारात्मक बोलतात, पण नंतर त्यांचे आदेश पाळत नाहीत, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठका होतात तेव्हा सर्व सकारात्मक बोललं जातं. मुख्यमंत्र्यांसह सर्वजण सकारात्मक बोलतात, मुख्यमंत्र्यांसह पुढे त्यांचे मंत्री, अधिकारी ते आदेश पाळत नाही. एकीकडे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही दुसरीकडे मात्र नोकर भरती सुरू करण्यात आली आहे , ही फसवणूक आहे, असा आरोप विनायक मेटेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऋषभ पंतच्या झुंजार खेळीनंतर लाडक्या बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
