🕒 1 min read
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे.
या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
दरम्यान, भारतीय टीमच्या विजयात रिषभ पंतने मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी देखील रिषभ पंतला संघर्ष करावा लागला होता. रिषभ पंतवर कसोटी सामन्यात देखील बऱ्याच टीका झाली होती. मात्र या बहाद्दर पठ्ठ्याने आपल्या झुंजार टीकाकारांची बोलती बंद केली आहे. पंतने नाबाद 89 रनची खेळी करत, अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.
दरम्यान,ऋषभची बहिण साक्षी पंतने दिलेली प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.साक्षी पंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर ऋषभचा एक फोटो आणि व्हिडिओ शेयर केला आहे. कायमच तुझा अभिमान वाटतो, सुपरमॅन, असं कॅप्शन साक्षीने या फोटोला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील महिला व वकील संघटनांनी दिल्या शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- मुलींच्या जुडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षणाच्या अनुदानात वाढ
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
