🕒 1 min read
Ambadas Danve । मुंबई : काल शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र या नंतर या विस्तारावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दैनिक सामनातून ‘भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदे गटाला कमी महत्वाची खाती दिली’ अशी टीका करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर देताना राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी टीकास्त्र सोडले आहे. दैनिक सामनातून होत असलेली टीका म्हणजे ‘उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय’ अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली आहे. तर यानंतर पाटलांच्या टीकेला आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
अंबादास दानवे म्हणाले कि, याच गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. त्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत. सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपने महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील ?
सरकारमध्ये काम करताना कोणाकडे कोणतं खातं, यापेक्षा सरकारची सामूहिक जबाबदारी असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Vinayak Mete Death। “दरवेळी चालकच कसे जखमी होत नाहीत?”; दीपाली सय्यद यांचे मेटेंच्या अपघातावर प्रश्न
- Independence Day | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात जयंत पाटलांकडून लालपरीचे सारथ्य
- Independence Day | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील जनतेला उद्देशून भाषण, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे
- Nana Patole | “हे दुरंगे तिरंग्याला संपवायला निघालेत”; नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
- Independence Day | मोहन भागवतांच्या हस्ते नागपुरातील RSS मुख्यालयात ध्वजारोहण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
