Share

Vinayak Mete Death। “दरवेळी चालकच कसे जखमी होत नाहीत?”; दीपाली सय्यद यांचे मेटेंच्या अपघातावर प्रश्न

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांचे निधन झाल्याची दुःखद घटना काल सकाळी घडली आहे. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या जाण्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. परंतु मेटेंचा अपघात झाला आहे कि, घातपात याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. कारण या अपघातात त्यांच्या गाडीचा चालक वाचला असून सोबत असलेला सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. यावरूनच आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनीही याबाबतीत शंका उपस्थित करत या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली.

दीपाली सय्यद यांनी ट्विट करत लिहले आहे कि, “समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात? आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो. शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने.” या ट्विटमधून त्यांचा रोष नक्की कोणाकडे आहे हे काही स्पष्ट होत नसलं तरीही अशाच शंका अनेकांनी उपस्थित केल्या आहेत. कारण अपघाताच्या आधी मेटेंची गाडी टोलनाका पार करत असतानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेटे हे मागच्या सीटवर बसल्याचे दिसत आहे. मग ते अचानक पुढे का आले? आणि खरंच पुढे आले होते का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच मेटे कधीही पुढच्या सीटवर बसत नव्हते, असंही त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

चालक पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान प्रथमदर्शनी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे. कालच विनायक मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीसाठी एकूण आठ पथकं तयार करण्यात आली आहे. फॉरेन्सिकची टीमही यामध्ये असणार आहे. पहाटे पाच वाजून ५ मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. यावेळी आपल्याला जवळपास एक तास मदत मिळाली नसल्याचा आरोप गाडीच्या चालकाने केला आहे. त्याच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते तर चौकशी नंतरच समोर येईल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!