पुणे : १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना शेलार म्हणाले की,’आम्ही शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीला दुष्मन मानत नाही. जे या या पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्री म्हणून होते. त्यांना न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयने प्रकरण हातात घेतल्यानंतर आणि ईडीसमोर आलेल्या माहितीवर अटक करावी लागली. हा राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा वेदनादायी हा प्रसंग आहे. पण भष्ट्राचाराच्या लढाईत जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाईशिवाय पर्याय नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कितीही आव आणला तरीही पळ काढता येणार नाही. अनिल देशमुखांनी शरद पवारांचा आदर्श ठेवायला हवा होता. अनिल देशमुखांना सर्व रस्ते बंद झाल्यानंतर शरण यावे लागले.’
दरम्यान, १०० कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना ४ ते ५ वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर काल(१ नोव्हें.)अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ईडीचे वरीष्ट आधिकारी दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. त्यांनी देशमुखांची चौकशी केली आणि अखेर १३ तासांनंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? मलिकांचा सोमय्यांना सवाल
- रामदेव बाबा यांची गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केंद्र सरकारकडे मागणी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- भाऊबीजेला भेट म्हणून अजित पवारांकडे सिलेंडर मागणार- सुप्रिया सुळे
- मी ६२ वर्षांपासून मुंबईत राहतोय, .. हिंमत कोणीही केली नाही-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

