Share

“…बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या”- आशिष शेलार

Published On: 

मुंबई: मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आज विराट मोर्चाचं आयोजन केले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांसह अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर घणाघाती आरोप केले. यावेळी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजून ताज्या आहेत, असे म्हणत शेलारांनी निशाणा साधला.

यावेळी आशिष शेलार असंही म्हणाले की, ”1993 चा बाॅम्बस्फोट आम्ही अजूनही विसरलो नाही. 84 लोक बाॅम्बस्फोटात मारले गेले. बाॅम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद होता. त्या बॉम्बस्फोटातील एक पीडित, तुषार देशमुख देखील आज येथे आलाय. तुषार हा सज्ञान देखील नव्हता. वरळी सेंचुरी बाजारजवळ टॅक्सीत स्फोट झाला आणि तुषारची आई जळून खाक झाली. मुंबईसाठी तुषारची आई शहीद झाली आणि त्यानं आपलं नाव तुषार प्रीती देशमुख असं लावायला सुरुवात केली. दुःख हे आहे की मेमन ज्याला फाशी झाली, त्याचे पार्थिव ओळखू येईल असं होतं मात्र आम्हाला पार्थिवाचं दर्शन घेता आलं नाही.”

मुख्यमंत्री मांडीला मंडी लावून बसतात 

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शेलार म्हणाले कि, ”मंत्रिमंडळात एक व्यक्ती अशी आहे जी मेमनला फाशी देऊ नका म्हणाली होती. त्या व्यक्तीचं नाव काय अस्लम शेख. उद्धवजी तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून बसता आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही म्हणता. साडे तीन जिल्हा म्हणजे महाराष्ट्र होत नाही.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!