Share

शेतकरी मित्रांनो, योजनेचा लाभ घ्या अन् कृषीपंपाचे वीजबिल कोरे करा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आता शेतकरी महावितरणच्या योजनेत सहभागी होऊन कृषीपंपाचे वीजबिल  कोरे करु शकणार. शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांनी थकीत बिलांपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ५० टक्के माफी होणार आहे. यासाठी आता २२ दिवस राहिले आहेत.

कृषी धोरण २०२० या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकऱ्यांना ही सुविधा देण्याचा निर्धार केला असला तरी अनेक दिवसांपासून योजना सुरु आहे. तरीही अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांचा सहभाग झालेला नाही. त्यामुळे राहिलेल्या काळात तरी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

योजनेचे फायदे –

ही योजना कृषीपंपासाठी असली तरी फार पूर्वीची थकबाकी वसुल करुन शेतकऱ्यांना चालू बिलापर्यंत आणण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यात शेतकऱ्यांचा चांगला फायदा आहे. यामध्ये सप्टेंबर 2020 अखेर असलेल्या थकबाकीतील दंड-व्याज माफ करून थकबाकी निश्चित केली आहे. त्यानुसार सुधारित थकबाकीवर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण आहे. आणि या वसुल झालेल्या रकमेतील 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. असा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!