Share

यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर आशिष शेलारांची टीका; म्हणाले, “आईच्या नात्याला काळिमा…”

Published On: 

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आशिष शेलार म्हणाले की,‘आईच्या नात्याला काळिमा लावू नका. कडवट हिंदूने ते करू नये. आईच्या नावाने खोटे बोलणारी जमात वाढत आहे’, असे शेलार म्हणाले.

दरम्यान, यशवंत जाधव यांनी आपल्या डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे म्हटले आहे. आपल्याला दानाची २ कोटी रुपयांची रक्कम मिळाली. याचा वापर मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या भेटवस्तू देण्यासाठी केला. तसेच आईच्या नावावर लोकांना घड्याळांचे वाटप केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!