Share

भारताविरुद्ध फायनल सामन्यासाठी ‘अशी’ हवी खेळपट्टी ; न्यूझीलंडच्या कर्णधाराची मागणी

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली. या दौऱ्यात पहिले भारतीय संघ जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. १८ ते २२ जुन दरम्यान साउथहॅप्मटन येथे भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान ही लढत होईल. यानंतर ऑगस्ट महिन्यात इंग्लंड संघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाला लंडनमध्ये पोहचल्यानंतर ‘साऊथम्पटन येथील एजेज बाऊल या स्टेडियमच्या शेजारील हिल्टन पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी वेगवेगळ्या वेळी जिम आणि मुख्य मैदानात ट्रेनिंग सुरू केली. आयसोलेशनच्या तिसऱ्याच दिवशी प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे.

दरम्यान,  किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसनचे लक्ष देखील आता हळूहळू भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याकडे लागले आहे. यामुळेच साऊथॅम्प्टनच्या खेळपट्टीवर जास्त गवत नसावे असे विल्यम्सनने म्हटले आहे. इंग्लंडमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने क्युरेटरने खेळपट्टीवर कमी गवत ठेवावे. केन म्हणाला, “त्यावरची गवत काढून टाकावी आणि त्याला चांगले रोलही करावे. आता किती पाऊस पडत आहे हे पाहता क्युरेटरने खेळपट्टीवर कमी गवत ठेवावी. इथले वातावरण वेगळे आहे आणि इथल्या ड्यूक्स बॉलचा सामना करणे खूप मनोरंजक असेल.”

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!