Share

हिजाब वादावर ओवसींनी पाकिस्तानला फटकारले; म्हणाले…  

Published On: 

नवी दिल्ली: हिजाब वादावर देशात वातावरण चांगलेच पेटले आहे. देश विदेशातून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. नोबल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाई हिने भारतीय नेते मंडळींना ह्या प्रकरणात लक्ष घालून मुस्लिम मुलींच्या हिजाबचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले होते. आता शेजारील राष्ट्र पाकिस्तानने ह्या प्रकरणात आपले डोके खुपसून भारताला हिजाब वादावर सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर ऑल इंडिया मजलीस-ए-मुसलमिन (AIMIM) चे अध्यक्ष असादुद्दीन ओविसी यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले.

असादुद्दीन ओविसी यांनी पाकिस्तानला, तुम्ही तुमच्या देशाचे बघा, आमच्या भांडणात पाय, नाक घुसवू नका, तुम्ही जखमी व्हाल. तुमच्या देशातील बलुचिस्थान आणि इतर प्रश्न सोडवा. आम्ही आमच्या देशातील प्रश्न सोडवायला समर्थ आहोत. तुमची सल्ले आम्हाला नको असे स्पष्ट शब्दात सुनावले.

उडीपि येथील एका शाळेत हिजाब घालून आलेल्या मुलींना शाळेने प्रवेश नाकारला होता. त्यानंतर कर्नाटकातील अनेक शाळांनी त्यांच्या धडा गिरवत हिजाब बंदी केली होती. त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. या वादात हिंदू संघटनांनी उडी घेत मुलांना भगवी शाल (शेले) घालण्याचे आवाहन केले आणि हा मुद्दा अधिक चिघळला. प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेले असून त्यावर १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने पूढील सुनावणीपर्यंत विद्यार्थ्यांना कोणताही धार्मिक पोशाख न करता शाळा, महाविद्यालयात परत यावे असे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!