औरंंगाबाद : शहराच्या विविध भागातून वाहन चोरट्यांनी तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. सध्या शहर हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे नाकाबंदीच्या वेळेत देखील बदल झाला आहे. याचाच फायदा घरत चोरट्यांनी शहरातून दुचाकी वर डल्ला मारला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.
गणेश सुधाकर काचेवार (वय ४८, रा.गोपाल अपार्टमेंन्ट, एमआयडीसी ऑफीस समोर, रेल्वेस्टेशन परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-सीएम-६०२१) चोरट्याने ३१ मे च्या रात्री घराजवळून चोरून नेली.
शशिकांत रावसाहेब बोरूडे (वय ३२, रा.चौधरी कॉलनी, चिकलठाणा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीके-५७७३) चोरट्याने ३१ मे रोजी गारखेडा परिसरातील एचडीएफसी फायनान्स कार्यालयाजवळून चोरून नेली. आनंद माधवराव गायकवाड (वय ४०, रा.गोकुळनगर, जाधववाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएन-३८९०) चोरट्याने २५ मे रोजी घराजवळून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे वेदांतनगर, पुंडलिकनगर आणि हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिल्खा सिंग यांची तब्येत पुन्हा खालावली ; ICU मध्ये दाखल
- ‘गोपीचंद पडळकर भाजपचे बुजगावणं, त्यांच्याकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी लक्ष देऊ नये’
- २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल असं काम करा; पटोलेंनी पुन्हा ठोकला ‘स्वबळाचा’ शड्डू
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘मला घाई होती, त्यामुळे पत्रकार परिषदेत ‘तत्वतः’ मान्यता हा शब्द राहिला’; वडेट्टीवारांच अजब स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

