🕒 1 min read
मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर उर्वरित स्पर्धा कधी आणि कुठे होणार असे प्रश्न विचारले जाऊ लागले. आखेर शनिवारी २९ मे रोजी बीसीसीआयने एका सर्वसाधारण बैठकीत आयपीएलच्या उर्वरीत सामन्याविषयी घोषणा केली.
आयपीएल स्पर्धेच्या उर्वरित सामन्याविषयी घोषणा करताच राजस्थान रॉयल्स संघाने एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत आनंद साजरा केला आहे. अक्षय कुमारच्या हे बेबी या चित्रपटातील ‘मस्त कलंदर’ या गितावर खेळाडूचे मुखवटे लावत नाचताना दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओत कर्णधार संजु सॅमसन, जोस बटलर, राहुल तवेतिया आणि ख्रिस मॉरीस या खेळाडूंचे मुखवटे दिसत आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. आयपीएलच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत आंनद साजरा केला आहे.
Wait, what? ????????????#HallaBol | #RoyalsFamily | #IPL2021 pic.twitter.com/63GIT4BGAp
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 29, 2021
४ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर उर्वरित सामने हे आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएई येथे होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामातील जेतेपदानंतर इतर हंगामात फारशी चमक नाही दाखवता आली नाही. आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान संघाची धुरा युवा कर्णधार संजु सॅमसनकडे देण्यात आली आहे. या हंगामात राजस्थानने ७ सामने खेळताना ३ सामने खेळलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- चोरट्यांनी पाच दुचाकी लांबवल्या
- ‘ठाकरे सरकारने जनगणना करून ओबीसींना पूर्ववत आरक्षण द्यावे’, भाजप ओबीसी मोर्चाची मागणी
- ‘महाविकास आघाडीतील अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध’
- ‘मोदीजी, ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘चंद्रकात पाटील ‘त्या’वेळी जागे होते की झोपेत?’, अजितदादांनी घेतली फिरकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
