Share

संचारबंदीची ऐशीतैशी, पांडेय यांचे हातावर घडी तोंडावर बोट!

Published On: 

औरंगाबाद : शुक्रवारी रात्री मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान शतपावलीसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी हिमायतबाग चौकातील चायनीज, चहा टपऱ्या आणि हॉटेलवर गर्दी पाहायला मिळाली. पोलीस प्रशासन झोपेत असल्यामुळेच शहरातील नागरिक संचारबंदीची ऐशीतैशी करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणावर आयुक्तांनी हातावर घडी आणि तोंडावर बोट ठेवणेच पसंद केले आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. मात्र शहरातील नागरिक अजूनही गंभीर झालेले नाहीत. याची प्रचिती शुक्रवारी रात्री महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांना हिमायतबाग चौकात आली. चौकातील चायनीज, चहा विक्रेते आणि हॉटेलवर अलोट गर्दी त्यातल्या त्यात कोणीही मास्क घातलेले नव्हते.

कोरोना आजाराचा संसर्ग कमी व्हावा, नागरिकांवर लॉकडाऊन लादण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने मागील काही दिवसांपासून रात्रीची संचारबंदी सुरू केली आहे. मात्र या संचार बंदीचा फारसा फायदा आतापर्यंत दिसून आलेला नाही. पोलीस प्रशासन कुठे तरी कमी पडत आहे. त्यामुळेच काही भागातील नागरिक संचारबंदी मोडताना दिसत आहेत.

शहरात अजूनही नागरिक स्वतःला शिस्त लावून घेण्यास तयार नाहीत. शुक्रवारी रात्री महापालिका प्रशासन हिमायत बाग चौकापर्यंत पायी फिरायला निघाले असता चौकातील दृश्य पाहून त्यांना चांगलाच धक्का बसला. या भागातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी ग्राहकांची अलोट गर्दी जमवून ठेवली होती.

दरम्यान आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी सकाळीच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक हिमायतबाग चौकात पोहोचले. सोबत नागरिक मित्र पथकाचे कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण हटाव विभागाने रस्त्यावरील तीन लोखंडी टपऱ्या, पाच शेड जमीनदोस्त केले. मास्क न घातलेल्या दहापेक्षा अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली, पी.बी. गवळी यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!