Share

यथावकाश केंद्राचा निधी येईलच पण तोपर्यंत राज्याने तातडीने मदत करावी- रावसाहेब दानवे

Published On: 

मुंबई : मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार मदत द्यावी, यथावकाश केंद्राचा निधी राज्याच्या आपदा निवारण निधीमध्ये जमा होईलच असेही दानवे म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे याबाबत ट्विट केले आहे. ‘केंद्र सरकारच्या एनडीआरएफ मधील निधी हा राज्याच्या एसडीआरएफ मध्येच येत असतो. केंद्रीय पथकांची दौरे, पाहणी होईलच आणि मदतीचा निधीही येईलच, तोपर्यंत राज्य आपदा निवारण निधीमधून शेतकरी बांधवांना तातडीने थेट मदत करावी. केंद्राकडून आलेला निधी यथावकाश राज्य आपदा निवारण निधीमध्ये जमा होईलच.’ असे ट्विट दानवे यांनी केले आहे.

अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी काल जालन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी दानवे म्हणाले, जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंबंधी महसूल यंत्रणेमार्फत ऑफलाईन पद्धतीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत सरकारने द्यावी असे मत दानवेंनी यावेळी व्यक्त केले.

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील १८२ परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील मोठ्या प्रमाणावर खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागल्याने नदीकाठच्या शेत जमीन व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे.

खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचले असले तरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती नव्याने होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!