🕒 1 min read
मुंबई : उद्योजक राज कुंद्राला अश्लिल व्हिडीओ प्रकरणात १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा यांना पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्रा यांना जामीन दिला आहे. राज कुंद्रावर अश्लील व्हिडीओ बनवून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केल्याचा आरोप आहे. पतीचा जामीन मंजूर होताच, शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे.

शिल्पा सोशल मिडीयावर सक्रिय असते. कठीण काळात देखील स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत होती. नुकतेच शिल्पाने इंद्रधनुष्य असलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर ‘एका मोठ्या वादळानंतरच सुंदर इंद्रधनुष्य दिसते. हे इंद्रधनुष्य वादळानंतरदेखील अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात हे सांगते’ या आशयाची पोस्ट शिल्पाने पतीचा जामीन मंजुर झाल्यानंतर केली आहे.
दरम्यान, राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता आणि सतत न्यायालयातून जामिनासाठी विनवणी करत होता. अशा परिस्थितीत काल बऱ्याच दिवसांनी त्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थॉर्प यांच्याविरोधात 1500 पानांचा चार्ट-शीट न्यायालयात दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- RCB चा लाजिरवाणा पराभव; केकेआरने केवळ 10 षटकांत जिंकला सामना
- चिपी विमानतळ सुरू करण्यास DGCA ची परवानगी; पुन्हा श्रेयवाद रंगणार ?
- पंतप्रधान मोदी आणि बायडन यांच्यात होणार प्रत्यक्ष महत्वाची बैठक; व्हाईट हाऊसने दिली माहिती
- महाराष्ट्र पुन्हा हादरला : नराधमांचा हैदोस, सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू
- पुणेकरांना आज मोठा दिलासा : नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
