Share

देश प्रेमापोटी वडील गेल्याच दुःख पचवून तो लढला आणि जिंकला

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात होता. ऑस्ट्रेलियामध्येच असताना त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. बीसीसीआयने सिराजला भारतात परत येण्याचा पर्याय दिला, पण या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने मोहम्मद सिराजने घेतलेल्या या निर्णयाचा आदर केला आणि या कठीण काळात सिराजचे सांत्वन केले होते.

सिराजने आपल्या वडिलांच्या स्वप्नामुळेऑस्ट्रेलियामध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. मोहम्मद सिराज म्हणाला होता कि, “माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि मी ते नक्कीच करेन. माझ्या पाठीशी नेहमी उभा असलेला एक भक्कम आधार मी गमावला. हा एक अतिशय दुःखदायक क्षण आहे. मला देशाकडून खेळताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते.”

यानंतर सिराज वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्याच जिद्दीने मैदानात उतरला आणि फक्त उतरला नाही तर भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटाही त्याने उचलला. मोहम्मद शमीला झालेल्या दुखापतीमुळे सिराजला मेलबर्न येथे आपले कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने 2 फलंदाजांना बाद केले. सिराजने पहिल्या डावात लाब्यूशानेचा घेतलेला बळी हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला. सिराजच्या या कामगिरीने भारतीय संघात नव्या जोशाची निर्मिती झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात देखील सिराज ने उत्तम गोलंदाजी करत 3 फलंदाजांना बाद केले. सिराजच्या या कामगिरीमुळे समालोचन करत असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्रा विशेष प्रभावित होताना दिसला. सिराजच्या या कामगिरीचे कर्णधार रहाणेने देखील कौतुक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!