🕒 1 min read
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
तर, दुसरीकडे कोल्हापुरात २५ हजार मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्या होणारा सोमय्यांचा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात जाणार असे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने ते उद्या सोमवारी कोल्हापुरात जाणार आहे. मात्र, सोमय्या यांच्याविरोधात मुश्रीफ यांचे २५ हजार कार्यकर्ते आक्रमक झालेत. ते कार्यकर्ते उद्या कागलमध्ये एकवटणार आहेत. सोमय्यांनी हिंमत असेल तर सर्व कारखाना सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. त्यानंतरच त्यांनी पुढे जावं, असा इशारा मुश्रीफ समर्थकांनी दिला आहे.
किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?
भाजप नेते किरीट सोमय्या यांची कारखान्यावर जाण्याची स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला अशी विचारणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुंबईतून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात मंत्री मुश्रीफ म्हणतात, माजी खासदार सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. तसेच त्यांनी आरओसीमधून मिळवलेली कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत.
यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झाली आहे. तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच. परंतु; किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला..? कारण त्याना एक सवयच लागली आहे की तक्रार करायची व तिथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची. त्यातूनच विनाकारण बदनामी करण्याचा प्रकार करायचा.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रीजी, महिला-मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा इथे नाही – चित्रा वाघ
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- किरीट सोमय्या स्थानबद्ध ? फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- खळबळजनक! मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश; सोमय्यांचा गंभीर आरोप
- ‘उद्धव ठाकरेंनी मला धमक्या देण्यापेक्षा मुश्रीफ, परब, सरनाईक यांना अटक केली पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
