मुंबई – मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने आज फेटाळला. तसेच या प्रकरणातील संशयित आराेपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Drugs on cruise ship case | Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha pic.twitter.com/Zww2mANkUB
— ANI (@ANI) October 20, 2021
आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. आजही एनडीपीएस न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केलेला नाही. बुधवारी एनसीबीने कोर्टात आर्यनच्या अशा काही चॅट सादर केले आहेत, जे ड्रग्ज विषयी होते. सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत. आरोपी आर्यन खान आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (सी), २० (बी), २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर त्याच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.असे असले तरीही काही काळासाठी का होईना पण आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागेल हे मात्र नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील कर्तबगार, निष्कलंक, छळकपट, विश्वासघात न करणारे नेते’; भाजप नेत्याचे स्तुतीसुमने
- ‘मराठवाड्याने कोकणातील १६८ टीएमसी पाणी विसरावे, याकरिता जयंत पाटलांकडून १९ टीएमसीचे गाजर’
- ‘लोकांना सिनेमा आणि नाट्यगृहापर्यंत पुन्हा कसे आणायचे हे मोठे आव्हान’, संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता
- हिंमत असेल तर शिंगावर घ्या, दिवस आणि वेळ कळवा; नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना प्रहारमधून आव्हान
- अभिनेत्रीच्या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

