मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान नुकतीच कसोटी मालिका संपुष्टात आली. या मालिकेत न्युझीलंडच्या संघाने इंग्लंडचा १-० अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना हा अनिर्णीत राहिल्यानंतर दुसरा सामना ८ गडी राखुन विजय मिळवत मालिका खिशात घातली.
या सामन्यानंतर इंग्लंडचा उपकर्णधार स्टुअर्ट ब्रॉडने सॉफ्ट सिग्नलच्या नियमाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. हा नियम आयसीसीने तत्काळ काढुन टाकावा या साठी कोणतीही बैठक न बोलावता हा नियम रद्द करण्यात यावा अशी मागणी ब्रॉडने केली होती. या नियमाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजुचा विचार करता नकारात्मक बाजुचा विचार करुन हा नियम रद्द करावा अशी मागणी त्याने केली आहे. न्युझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर डेवॉन कॉनवेच्या वादग्रस्त निर्णयावर बोलताना त्याने हे वक्तव्य केले.
यावेळी तो म्हणाला की, ‘कॉनवे हा २२ धावांवर खेळत असताना जॅक क्रॉलीने त्याचा स्लिपमध्ये झेल घेतला होता. मैदानावरील पंचानी अंतिम निर्णयासाठी तिसरे पंच मायकेल गफ यांचा सहारा घेतला. त्यांनी कॉनवेला नाबाद घोषीत केले. जॅकला खात्री होती की त्याने झेल घेतला होता. त्यावेळी कर्णधार जो रुट आणि यष्टीरक्षक जेम्स ब्रेसी यांनाही ही खात्री होती. पण मैदानावरील पंच दुर असल्यामुळे त्यांना शंका होती यात काही गैर नाही. जेव्हा टीव्ही रिप्लेमध्ये पुन्हा बघण्यात आले तेव्हा सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर कॉनवेला नाबाद देण्यात आले.’ असे ब्रॉड म्हणाला. यानंतर कॉनवेने ८० धावांची निर्णायक खेळी साकारत न्युझीलंडच्या डावात महत्वाची भूमिका निभावली.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतीय टीम फायनलचे आव्हान पेलण्यास सज्ज’ ; पुजाराने व्यक्त केला विश्वास
- ड्यू प्लेसिसनं दुखापतीनंतर दिली अपडेट, म्हणाला…
- दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे करोनामुळे निधन
- डुप्लेसीसच्या गंभीर दुखापतीनंतर पत्नीची भावुक करणारी पोस्ट
- डब्ल्युडब्ल्युईचा ‘जॉन’ निघाला ‘विराट’चा फॅन ; शेअर केला फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

