पुणे – गेले काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड़ संदर्भात तक्रारी येत आहेत. निकृष्ट दर्जाचे फिड्स मिळाल्याने अनेक पोल्ट्रीफार्म धारकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी तर या कंपन्यांच्या विरोधात अनेक पोल्ट्रीफार्म चालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
‘झापा’ सोबतच ‘बारामती अॅग्रो’ या कंपनीचे फीड देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे आजच एका शेतकऱ्याने व्हिडीओच्या माध्यमातुन समस्या मांडत सांगितले आहे. योगेश चौरे असे या पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्याचे नाव असून या बारामती अॅग्रोसह अन्य काही कंपन्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या निकृष्ठ दर्जाच्या फिड्स मुळे कोंबड्या अंडी देत नसल्याची मुख्य तक्रार असून यामुळे प्रोडक्शन कमी झाले असल्याची समस्या आहे.
सरकारने सलून सुरू करण्यास परवानगी दिल्याने #KJIDF मार्फत माझ्या मतदारसंघातील सर्व सलून चालकांना त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा किट देण्यात येतंय. आज खर्डा इथंल्या सलूनमधील कारागिरांना सुरक्षा किट दिलं असता, यावेळी अनेक दिवसांनी विठ्ठल थोरात यांच्या सलूनमध्ये ट्रिमिंग केलं. pic.twitter.com/5I5zx2pKXC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2021
या संदर्भात या नामवंत कंपन्यांचे व्यवस्थापन देखील या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत दखल घेत नाही व उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. कंपनीला अजुन ही समस्या कशामुळे उद्भवली आहे हे देखील सांगता येत नाहीये. शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप देखील चौरे यांनी केला आहे. रोहित पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये असताना पवार हे साधी शेतकऱ्यांची भेट देखील घेत नसल्याने व्यथित झालो आहोत असे देखील चौरे म्हणाले.
शाळेत असताना मित्रांसोबत उन्हाळ्यात अनेकदा पेप्सी खायचो. सध्या जून महिना असला तरी उन्हाचा चटका चांगलाच जाणवतोय. त्यामुळं हळगावमध्ये सुरेश शेठ कांकरीया यांच्या सचिन ट्रेडर्स या दुकानाला सदिच्छा भेट दिली तेंव्हा पुन्हा एकदा पेप्सीची टेस्ट घेतली, तेंव्हा
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. pic.twitter.com/E2IP2BMKWT— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 13, 2021
दरम्यान, निकृष्ठ दर्जाच्या फिड्सचा पुरवठा झाल्याने समस्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी पवार यांच्याकडे वेळ नाही मात्र सलूनमध्ये ट्रिमिंग करुन घेतल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करायला कसा काय वेळ आहे असा सवाल उपस्थित होत आहे. याशिवाय रोहित पवार यांनी नुकतेच पेप्सी खातानाचे फोटो देखील नुकतेच सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. यावर देखील आता प्रश्न उपस्थित केले जात असून चमकोगिरी करण्यासाठी प्रचंड वेळ असणाऱ्या पवारांना पोल्ट्री चालकांचा आक्रोश ऐकू येत नाही का असा देखील सवाल उपस्थित होत आहे. पवार जर फक्त काही वेळ या व्यावसायिकांशी बोलले तर यांना दिलासा मिळू शकतो मात्र याकडे तर दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कर्णधाराच्या अनुपस्थितीत न्युझीलंडने इंग्लंडविरुद्ध मिळवलेला विजय; भारतासाठी धोक्याची घंटा
- कडकनाथ रिटर्न्स ? रोहित पवारांवर आणि बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याने केले गंभीर आरोप
- ‘सॉफ्ट सिग्नलचा नियम आयसीसीने रद्द करावा’, स्टुअर्ट ब्रॉडने केली मागणी
- दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर किसान सभेचं आंदोलन !
- राज्यकर्त्यांना देशाची फाळणी करायचीये; उदयनराजेंचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

