मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण दूषित झाला असून राजकीय पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाशी खेळी खेळत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षाचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे.
संदीप देशपांडे यांचा सवाल-
आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे मराठी कर्मचाऱ्यांची उपासमार होतं असून, गुजराती कंपन्यांना मातोश्रीतून यांनी कंत्राट दिलेत. मराठीचा पुळका आणता मग मराठी कर्मचाऱ्यांना न्याय का देत नाही?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबई शहरांतर्गत धावणारी सिटी बस सेवा अर्थात ‘बेस्ट’ हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. बेस्टने ज्यांच्या बरोबर करार केलाय त्या कंपन्या कामगारांना पैसा देत नसल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला आहे त्याचबरोबर शिवसेना पक्षाची मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून सत्ता असूनही उत्सव तोंडावर आलेले असताना या कामगारांचा वर्षभरापासूनचा पगार दिलेला नाही, मग असं असताना या स्थितीला जबाबदार कोण? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
लोकेश चंद्रा यांना केबिनमध्ये बसू देणार नाही-
तसेच लोकेश चंद्रा यांचा या बेस्ट मध्ये होणाऱ्या गैरकारभाराकडे लक्ष नसल्यासही त्यांनी सांगितले. या सगळ्या विषयी कामगार आणि मनसेच्या वतीने त्यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केले होते. परंतू त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र आम्ही त्यांना 5 सप्टेंबर पर्यंत अल्टिमेटम देत आहोत नाही तर सहा सप्टेंबरला आम्ही लोकेश चंद्रा यांना त्यांच्या केबिनमध्ये बसू देणार नाही असही देशपांडे म्हणाले आहेत.
मनसेचा इशारा-
पुढे ते असेही म्हणाले की, यापूर्वीच आम्ही या सगळ्या विरोधात तक्रार केली होती. त्यावेळी कॅगचं ऑडिट करणार, असं आश्वासन आम्हाला दिलं गेलं होतं मात्र पालिकेचा ऑडिट विभाग आधीपासूनच आहे. त्याचबरोबर अजूनही 2200 जागा भरलेल्या नाहीये. त्यामुळे येत्या काळात मनसे महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणार आहे त्याचबरोबर मनसेच्या रोड संदर्भातले ही काही पुरावे हाती लागले असल्याचा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | गद्दारांचे सरकार बनवण्यामागे कोण होत हे आता समोर येतंय; आदित्य ठाकरेंचा रोख फडणवीसांकडे?
- Sandeepan Bhumre | संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमाला आटलेली गर्दी पाहून लोक बोलले, “आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम…”
- Vinayak Raut | दसरा मेळाव्यावरून आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली, नीच राजकारण सुरूये; राऊत आक्रमक
- Dussehra Melava | शिवसेना नंतर आता दसरा मेळावा नेमका कोणाचा? उद्धव ठाकरे गट की एकनाथ शिंदे गट?
- Sambhaji Brigade | नवीन आहोत पण गाफील नाही, तुम्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी दहशत का? – संतोष शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

