🕒 1 min read
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली असल्याची घोषणा केल्यानंतर आता याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीवर निशाणा साधला आहे. जे नियमात आहे ते होईल. नियमाच्या बाहेर जाऊन या सरकारमध्ये काहीही होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहे. या पक्षाचा काय निर्णय आहे हे मला माहित नाही. मेळावा घेणार की नाही. याची कल्पना नाही. उध्दव ठाकरे मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही. गृहमंत्री म्हणुन एवढच सांगु शकतो की, जे नियमात असेल ते आम्ही करु. असं फडणवीस म्हणले.
विनाशकाली विपरीत बुद्धी, एवढेच मी म्हणेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस एक बुडती जहाज आहे, ज्यांना हे वाटतं की आता या जहाजाला वाचवता येणार नाही, असे लोक वेगळे निर्णय घेतात. मला वाटत आहे गुलामनबी आझाद यांनी काही वैद्य मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे आणि त्यावर मी काय बोलणार? असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमानंतर अंबादास दानवे यांची खोटक टीका, म्हणाले…
- Aditya Thackeray | गद्दारांचे सरकार बनवण्यामागे कोण होत हे आता समोर येतंय; आदित्य ठाकरेंचा रोख फडणवीसांकडे?
- Sandeepan Bhumre | संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमाला आटलेली गर्दी पाहून लोक बोलले, “आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम…”
- Vinayak Raut | दसरा मेळाव्यावरून आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली, नीच राजकारण सुरूये; राऊत आक्रमक
- Dussehra Melava | शिवसेना नंतर आता दसरा मेळावा नेमका कोणाचा? उद्धव ठाकरे गट की एकनाथ शिंदे गट?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
