Share

Devendra Fadanvis | “गुजरात निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत हे दाखवलं” ; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadanvis | मुंबई :  गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जसजसा हाती येत आहे त्यातून हे स्पष्ट झालं आहे कि भाजपने या वेळीही बाजी मारलेली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत २७ वर्षांच्या सत्तेनंतरही पुन्हा ऐतिहासिक विजयासह सत्तेत येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं.” माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसला चांगलाच टोला लगावला.

“लोकांनी मोदींवर आणि भाजपावर पूर्ण विश्वास टाकला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ ते १७ जागा मिळताना दिसत आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा निचांक आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला चिमटा काढलाय.

पुढे ते म्हणाले, “ज्यांनी आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही घोषित केला होता असा आप नावाचा पक्ष तोंडावर आपटला आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एका टीव्ही शोमध्ये गुजरात निवडणुकीत त्यांना किती जागा मिळणार हे लिहून दिलं होतं. त्या किती जागा होत्या त्या त्यांना आणि त्या टीव्ही चॅनलला माहिती आहे. परंतु, आजच्या निकालाने अरविंद केजरीवाल दिल्लीचे नेते आहेत आणि दिल्लीच्या बाहेर ते नेते नाहीत आणि त्यांचा पक्षही नाही हे दाखवून दिलं आहे.”

महत्वाच्या बातम्या ;

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!