औरंगाबादः पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोजगार व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शनिवारी मंत्र्यांची उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आला. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुकता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिले. यावरुन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं ट्विटः
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ट्विट केलं आहे. सुरत, गुहावाटी, गोवा आणि मुंबई अशी देश भ्रमंती करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदार संघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती, अशा प्रकारे दानवे यांनी खोचक टीका केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
पाहा ट्विटः
सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे @SandipanBhumare आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!#गद्दार pic.twitter.com/FFIITFcpb2
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 27, 2022
आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौराः
शिंदे गटाने केलेला बंड मोडून काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मागील महिन्यांपासून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे. औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. यावेळी ज्या ठिकाणी आमदार शिंदे गटात आले तिथेच आदित्य ठाकरेंनी शिवसेना मेळावा घेतला. त्यामुळे पैठणमध्ये ही आदित्य ठाकरे यांची जोरदार सभा झाली होती. सभेसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी देखील जोरदार तयारी केली होती. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमली होती. मात्र भुमरे यांच्या कार्यक्रमालाकेवळ शंभर लोकांची गर्दी पाहून जमलेल्यांना आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यातील गर्दी आठवत आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Aditya Thackeray | गद्दारांचे सरकार बनवण्यामागे कोण होत हे आता समोर येतंय; आदित्य ठाकरेंचा रोख फडणवीसांकडे?
- Sandeepan Bhumre | संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमाला आटलेली गर्दी पाहून लोक बोलले, “आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम…”
- Vinayak Raut | दसरा मेळाव्यावरून आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली, नीच राजकारण सुरूये; राऊत आक्रमक
- Dussehra Melava | शिवसेना नंतर आता दसरा मेळावा नेमका कोणाचा? उद्धव ठाकरे गट की एकनाथ शिंदे गट?
- Sambhaji Brigade | नवीन आहोत पण गाफील नाही, तुम्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी दहशत का? – संतोष शिंदे


