Share

जाणून घ्या अरुण जेटलींची प्रकृती आता कशी आहे ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा– माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस उप-राष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन केली. जेटली यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे काल या रुग्णालयात भरती करण्यात आलं. जेटली हे उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे असं नायडू यांनी नंतर ट्विटद्वारे सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती अस्थिर आहे. जेटली यांच्यावर किडनी संदर्भातील आजारावर उपचार सुरू होते. जेटली यांच्यावर सप्टेंबर 2014 मध्ये बॅरिएट्रिक ऑपरेशन करण्यात आले होते. मधुमेहामुळे त्यांचे वजन वाढत होते आणि त्यामुळेच जेटली यांचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हा प्रथम मॅक्स रुग्णालयात नंतर AIIMS मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते.

प्रकृतीच्या अस्थिरतेमुळेचं अरुण जेटली यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीमधून माघार घातली होती. जेटली यांनी पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून मंत्रिपदासाठी आपला विचार करू नये अशी विनंती केली होती. या पत्रात त्यांनी गेल्या 18 महिन्यांपासून प्रकृती खराब असल्याचे म्हटले होते. प्रकृती ठिक नसल्यामुळे आपण जबाबदारी पार पाडू शकत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळात आपल्या नावाचा विचार करू नये असे त्यांनी म्हटले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!