Share

औरंगाबादेत कृत्रिम पाऊस असल्याचा वेधशाळेचा दावा

Published On: 

औरंगाबाद: दहा ते पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री औरंगाबाद शहरात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे विमानाद्वारे पाऊस पडण्याची प्रक्रिया करण्यात येत आहेत याचा अनुषंगाने शुक्रवारी पडलेला पाऊस हा कृत्रिम असल्याचा दावा चिकलठाणा वेधशाळेने केला आहे.

मराठवाड्यात सतत गेल्या तीन ते चार वर्षापासून दुष्काळ पडत आहे यंदाही पावसाळा अर्ध्यावर आला तरीही अजून दमदार पाऊस झाला नाहीत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सलग पाच दिवस रिमझिम झाली होती पण तोही समाधानकारक नव्हता त्यानंतर महिनाभरापासून पाय पाऊस गायब झाला होता. शासनाने मराठवाड्यात कृत्रिम पाडण्याचा निर्णय घेतला. कोट्यावधी रुपये खर्च करून हा पाऊस पाडण्यात येणार होता यासाठी विदेशातून विशेष विमान ही बोलावण्यात आले होते.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढगांमधील बाष्पीभवन क्षमता तापमान वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. त्यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधील बाष्पाचे प्रमाण वाढून ती विशिष्ट तापमानाला थंड केले कि त्याचे पाण्याच्या थेंबात रुपांतर होते. गेल्या काही दिवसापासून पाऊस पडण्यासारखी वातावरणच विमानाला मिळत नव्हते.

शुक्रवारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण निर्माण झाल्याने ढगावर विमानाच्या साह्याने रसायन फवारण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी दुपारी काही ठिकाणी हलका तर रात्री नऊ नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस आला .पाऊस कृत्रिम असल्याचा दावा चिकलठाणा वेधशाळेने केला आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!