Share

अबू आझमी हे स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू समजतात का ?

Published On: 

पुणे : राज्यात सद्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. एका मंत्र्यासोबत या प्रकरणाचे धागेदोरे आढळून आल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. पूजाला न्याय मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.याआधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नेते मेहबूब शेख यांचे नाव देखील वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आल्याने राज्यातील महिला सत्ताधारी नेत्यांपासून सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात आवाज बुलंद होत असताना महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी करत महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले आहे.

‘पडद्याशिवाय राहिलात, पुरुषांमध्ये फिरलात, लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिलात, तर अशा गोष्टी होण्याची शक्यता वाढते. अशा गोष्टींची तक्रार झाल्यानंतर पुरुषाचं नाव मीडियात अजिबात येता कामा नये. देशात कायदा चुकीचा आहे. कायद्यानुसार कोणतीही स्त्री लग्नाशिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशनमध्ये. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय तर, महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आणि वर्षभरानंतर सांगतात माझा बलात्कार झाला,’ अशी टिप्पणी अबू आझमी यांनी केली आहे.

अबु आझमी यांच्या या वादग्रस्त विधानामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अबू आझमी यांना चांगलेच झापले आहे. ‘नेतेमंडळी महिलांना बदनाम करण्यासाठी असे स्टेटमेंट करत आहे. कारण अनेक नेत्यांचे नाव सध्या बलात्कार प्रकरणांमध्ये आल्यामुळे त्यांना वाचविण्याचे काम त्यांचे सहकारी, पक्ष आणि आघाडी करत आहे. म्हणूनच मग महिला कशा चुकीच्या आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न काल अबू आझमींच्या माध्यमातून केला गेला म्हणजे महिलांना बदनाम करण्याचा डाव सध्या राजकारण्यांच्या माध्यमातून होतोय,’ असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील अबू आझमींना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या विधानाचा निषेध केला आहे. ‘लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे “मालक” समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ?’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान,आझमी यांनी केलेली हि वक्तव्य ते किती विकृत मनोवृत्तीचे आहेत हे दर्शविणारे आहे. आझमी हे पुरुषसत्ताक पद्धतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत असे म्हटले तरी देखील वावगे ठरणार नाही. याशिवाय आझमी हे स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू समजतात का असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!