Share

पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Published On: 

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 1 हजार 210 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 15 हजार 901 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 21 एप्रिल 2020 रोजी 102.34 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 22.91 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 1 लाख 2 हजार 917 स्थलांतरित मजुरांची सोय

1 लाख 75 हजार 449 मजुरांना भोजन

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 149 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 915 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 1 हजार 64 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 1 लाख 2 हजार 917 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 75 हजार 449 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!