Share

सातारच्या भामट्याला सोलापुरात अटक

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर- जिल्‍ह्यातील तरुणांना एमएसईबीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणा-या भामट्याला पोलिसांनी अटक केली. हा ठकसेन साता-यातील असून त्याने तब्‍बल २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संदिप आनंदा राऊत (रा. कवठे ता. वाई जि. सातारा) असे अटक केलेल्या ठकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, वीज मंडळातील वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत म्हणून राऊत यांनी बार्शी, तुळजापूर, मोहोळसह जिल्ह्यातील विविध भागातील जवळपास पंधरा मुलांकडून वीस लाखांहून अधिक रुपयांची रक्कम गोळा करून नोकरी लावण्याचे अमिष दाखविले होते. परंतु त्याने सातत्याने विचारणा करूनही नोकरी लावली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली म्हणून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पोलिसांनी राऊतला अटक केली आहे. दरम्यान, वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून राऊतने अनेक महिलांचीही फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!