🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात म्हटले होते की, “मशिदींमधले लाऊडस्पीकर इतके जोरात का वाजवले जातात? हे थांबवले नाही तर मशिदींबाहेरील स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाईल. मी नमाजच्या विरोधात नाही, मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. मात्र मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा.” आता यावरूनच समाजवादी पक्षाचे अबू आझमी (Abu Azmi) यांनी थेट राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे.
“राज ठाकरे यांच्यासारखे लोक ज्यांच्याकडे कोणतीही सीट नाही, ते धर्मांत वाद निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी.”, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे. तसेच ते म्हणाले की, राज ठाकरेंनी द्वेषाचे राजकारण करू नये. लोक हुशार आहेत. काय करावे आणि काय करू नये हे त्यांना माहीत आहे. आम्ही अशा विधानांचा निषेध करतो आणि राज यांना द्वेषाचे पुजारी बनू नका अशी विनंती करतो.
तसेच एखाद्या पराभूत नेत्याला ध्वनिप्रदूषणाची एवढी काळजी असेल, तर त्याने कधी बिअर बारमधील डीजे, लग्नसमारंभातील डीजे, नेत्यांच्या स्वागत समारंभातील फटाके, गणपती, नवरात्री आणि इतर ध्वनी प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवला आहे का? आम्ही त्यांना विनंती करतो की हनुमान चालीसा आनंदाने पाठ करा पण मंदिरात. रस्त्यावर नाही. असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आज अजिंक्य गुजरातला पंजाब संघ भिडणार; जाणून घ्या कोणता संघ ठरेल वरचढ
अबब.. आयएनएस विक्रांतसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी
“वाचाळ आणि गचाळ बडबड दुसरं काही नाही”, संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर राम सातपुतेंचा टोला
IPL 2022: दिल्लीचा दुष्काळात तेरावा महिना; पराभवानंतर कर्णधार ऋषभला भरावा लागणार लाखोंचा दंड!
“महागाईमुळे सामान्य जनता हवालदिल असताना आता औषधाचे दर…”, राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
