🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून कंगनाचा पदमश्री काढून घ्यावा आणि तिला अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. ‘भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले, असं कंगना म्हणाली. तिच्या याच वक्तव्यावरून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
असे विधान करण्यापूर्वी कंगना रणौतने मलाना क्रीमचा भारी डोस घेतल्याचे दिसते. मोहतरमाने मलाना क्रीमचा डोस वाढला आहे, म्हणून ती उल-जुलूलबद्दल बोलत आहे. केंद्र सरकारने कंगना राणौतचा पद्मश्री परत घ्यावा अशी आमची मागणी आहे.
नवाब मलिक यांच्याशिवाय इतर राजकारण्यांनीही अभिनेत्रींकडून पुरस्कार परत घेण्यासाठी आवाज उठवला आहे. कंगना रणौतने एका टीव्हीवरील कार्यक्रमादरम्यान असे म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यावर 2014 नंतरच भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले. तिच्या या सर्व विधानांवरून बराच गदारोळ झाला आहे.
यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी कंगनाच्या वक्तव्याला धक्कादायक आणि अपमानास्पद असे संबोधले आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रानौतला दिलेला पद्म पुरस्कार परत घेण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाने मुंबई पोलिसांकडे अर्ज दाखल करून रानौत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी अभिनेत्रीचे वक्तव्य ‘देशद्रोही’ असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
- भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; मलिकांचा खळबळजनक आरोप
- ‘आधी 150 रुपये वाढवायचे नंतर रुपया, सव्वा रुपया कमी करायचे, हे धंदे बंद करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
